पण…नियोजनबद्ध आयुष्याची सुरुवात तर करा.

OVERWORKED

परेशान थी चम्पुकी वाईफ
नॉन हेपनिंग थी उसकी लाईफ
चम्पुको न मिलता था आराम
ऑफिसमें करता था काम ही काम

चम्पू के बॉस भी थे बडे कूल
प्रमोशन को हर बार जाते थे भूल
पर भुलते नही थे वो डेडलाईन
काम वो करवाते थे टील नाईन

चम्पू भी बनना चाहता था बेस्ट
इसलिये वो नही करता था रेस्ट
दिनरात करता वो बॉस की गुलामी
ऑनसाईट की उम्मीद में देता सलामी

दिन गुजरे, गुजरे फिर साल
बुरा होता गया चम्पुका हाल
चम्पुको अब कुछ याद ना रहता था
गलतीसे बिवीको बहनजी कहता था

आखिर एक दिन चम्पू को समझ आया
और छोड दी उसने ऑनसाईट की मोह माया
बॉस से बोला तुम क्यों सताते हो
ऑनसाईट के लड्डू से क्यों बुद्धू बनते हो

प्रमोशन दो वरना चला जाऊंगा
ऑनसाईट देनेपर भी वापस ना आऊंगा
बॉस हंस के बोला “नही कोई बात,
अभी और भी चम्पू है मेरे पास”

“यह दुनिया चम्पुओंसे भरी है
सभी को बस आगे जाने की पडी है
तुम ना करोगे तो किसी और से कराउंगा
तुम्हारी तरह एक और चम्पू बनाउंगा.” 

दैनंदिन जीवनात अशा गोष्टी आपल्यासाठी नित्याच्याच असतात. आपल्या अवतीभोवती हे सतत घडतच असते. कधी आपल्या आयुष्यात तर कधी दुसऱ्या कुणाच्या तरी आयुष्यात आपण एखादा चंपू पाहताच असतो. किंवा कुठेतरी आपलाच चंपू झालेला असतो. पण हे असेच चालते आणि त्याबाबत कुणी काहीही करू शकत नाही अशीच आपली धारणा झालेली आहे. आपल्यासोबत असे घडले असेल तर फारतर चरफडून आपण आपल्या भावना कुणासमोर व्यक्त तरी करतो किंवा वैफल्याने ग्रस्त होतो. पण पुढच्या क्षणी नेमेची येतो पावसाळा ह्या उक्तीप्रमाणे तेच जीवन पुढे चालू ठेवतो.

हे स्वाभाविक आहे कारण आता जीवन पद्धतीच अशी झाली आहे की कुणा ना कुणासमोर हाजी हाजी करावीच लागते नाहीतर आयुष्य जगणे शक्यच होणार नाही. असे आपण स्वतःच स्वतःला समजावतो किंवा दुसऱ्या कुणाचे असे बोल ऐकून मनाचे सांत्वन देखील करून घेतो.

असे जर नाही वागलो तर ह्या जगात निभावच लागणार नाही आपला, जगणे कठीण होऊन जाईल. कारण आपल्याला जगण्यासाठी आवश्यक गोष्टी मिळविताच येणार नाहीत. आपली स्वप्ने तर सोडाच, साधे अस्तित्व देखील टिकवता येणार नाही आपल्याला. त्यामुळे जे चालतंय ते तसेच चालुद्या. जोपर्यंत सहन करू शकतो तोपर्यंत सहन करूया नंतरचं नंतर बघू, काही ना काही मार्ग निघेलच. पण वाट पाहत आयुष्य निघून जाते आणि येते ते फक्त म्हातारपण, तेही न जाण्यासाठीच. त्यावेळी आपल्याला सतत वाटत राहते की आपण खूप वेळ फुकट घालविला वाट पाहण्यात आणि आपण करत होतो तेच बरोबर आहे हे सिद्ध करण्यात. योग्य वेळीच निर्णय घ्यायला हवा होता. थोडीशी जोखीम पत्करायला हवी होती…पण दुर्दैवाने तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो.

संपूर्ण जग एक दिवस सर्वकाही ठीक होईल ह्याच आशेवर जगतो आहे आणि आपणही त्याच गर्दीचा भाग असतो, त्यामुळे जे जगाला मिळते तेच बहुतांशी आपल्यालाही मिळते. तशापण खूप साऱ्या गोष्टी आपल्याला वारसा हक्कानेच मिळतात, नाही का? मग ती आशा असो वा भीती. आशा आणि भीती एका मर्यादेपर्यंत चांगलीच पण त्याचा डोस वाढला तर मात्र आयुष्यात त्याच्या पलीकडे काहीच दिसत नाही. त्यामुळे तुम्ही ठरवा किंवा नका ठरवू दोन्ही बाबतीत तुमचा चंपू होणे हे अगदी ठरलेलेच.

जे त्या गर्दीतून बाहेर पडताना आपल्या डोळ्यांवर बांधलेली भीतीची किंवा आशेची झापडे बाजूला सारून डोळे उघडे ठेवून मोजूनमापून आणि नियोजनबद्ध जोखीम पत्करतात त्यांचे आयुष्य बदलायला सुरुवात होते. कारण आयुष्यभर त्या गर्दीचा भाग होण्यात धन्यता मानण्याऐवजी ते आपला मार्ग स्वतः निवडतात.

धोका पत्करायचा म्हणजे काही तुफानीच करायला हवे असा बहुतेकांचा समाज असतो पण कित्येकवेळा त्या तुफानी करण्याच्या नादातही कित्येकांचा तुफानी चंपू बनतो.

त्यामुळे आयुष्यात तुम्ही जिथेही असाल तिथून एक छोटीशी सुरुवात करा. एका वेळेला एक पाऊल पुढे टाका आणि नंतरच दुसरा. सुरुवात कितीही छोटी का असेना, ती होणे महत्वाचे असते.

तुमचे आयुष्य घडविण्यासाठी कुणाच्या बटन दाबण्याची वाट पाहू नका नाही तर पुढचे चंपू तुम्हीच असाल.

डोळ्यावरची झापडे जोपर्यंत गळून पडत नाहीत तोपर्यंत नियोजनबद्ध आयुष्य जगणे केवळ अशक्यच असते पण चंपू बनणे सहज शक्य. निवड तुमचीच आहे.

शैलेश तांडेल
Life Skills Trainer & Mentor
http://www.searchlightwithin.com

Advertisements

About Shailesh Tandel

A versatile trainer & coach who conducts seminars in Marathi on various subject such as success, time management, leadership etc.thru Searchlight Within-From Momentum to Miraculous & Also a owner of World Trade Courier- Delivery with Love & Care
This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s